गणेशोत्सव 2024

Shreemant Dagdusheth Ganpati: यंदाही दुपारी चार वाजता निघणार दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक

यंदाच्या गणेशोत्सव आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची पत्रकार परिषद झाली.

Published by : Dhanshree Shintre

यंदाच्या गणेशोत्सव आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची पत्रकार परिषद झाली. गणेशोत्सवामध्ये सुरक्षितता त्याचप्रमाणे गणेश भक्तांसाठी आवश्यक सोयी सुविधा महत्त्वाच्या असतात. त्यादृष्टिकोनातून मंडळाकडून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी मंडळानं वर्षानुवर्षे वर्षे चालत आलेल्या परंपरेला फाटा देत दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणूक काढली होती.

त्याआधी रात्री उशिरा मिरवणूकीला सुरुवात होत होती. त्यामुळे गणेश भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी तासनतास ताटकळत राहावं लागत होतं. त्याचप्रमाणे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ हा देखील मोठा प्रश्न बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर दुपारीच म्हणजे मानाच्या गणपती पाठोपाठ विसर्जन मिरवणूक काढून गणेश चतुर्दशीच्या दिवशीच बाप्पाचे विसर्जन करण्याचा नवीन पायंडा मंडळाने गेल्या वर्षीपासून पाडला आहे. यावर्षी देखील तोच शिरस्ता कायम ठेवण्यात येणार आहे.

गणेश चतुर्दशीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे. यावर्षी मंडळातर्फे हिमालयातील जटोली शिवमंदिरची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्या मंदिरात कर्नाटकातील श्री दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते गणेश चतुर्थीला सकाळी 11:11 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषिपंचमीनिमित्त बाप्पा समोर 31 हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्षक पठण होणार आहे.

गणेशोत्सव काळात गणेश भक्तांसाठी 50 कोटींचा विमा मंडळातर्फे उतरवण्यात येणार आहे. मांडव परिसरात 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मांडवापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या गणेश भक्तांसाठी विविध ठिकाणी चार मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. समाज माध्यमांवर देखील 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. बाप्पाची मिरवणूक सकाळी 8:30 वाजता मुख्य मंदिरापासून निघणार आहे. आगमनासाठी सिंह रथ तयार करण्यात येत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी